बसअभावी विद्यार्थिनी निघाल्या विद्यालयात पायी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार प्राजक्त तनपुरे हे एका कार्यक्रमासाठी वांबोरी येथे जात असताना अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी बसअभावी शाळा महाविद्यालयात पायी जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आमदार तनपुरे यांनी थांबून विद्यार्थिनींची विचारपूस करून स्वतःच्या वाहनातून विद्यार्थिनींना महाविद्यालयात सोडले.

शासन आपल्या दारी” उपक्रमासाठी गुरुवारी (दि. १७) शिर्डी येथील काकडी विमानतळानजीक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने गावोगावी नागरिकांसाठी एसटी बसची सोय केली होती. परिणामी प्रवाशांसाठी बसची संख्या अपुरी होती.

यामुळे तालुक्यातून येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. आमदार तनपुरे यांची कीर्ती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तनपुरे म्हणाले, जनतेच्या सोयीसाठी “शासन आपल्या दारी हा उपक्रम शिंदे फडणवीस सरकारने सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा घेऊन सरकारच जनतेच्या दारी जात आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आणून देत राहुरी- वांबोरी रोडवरील व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.

सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले’, असा दावा प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. वांबोरी येथील बसस्थानकानावर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींची गर्दी पाहून भेट घेतली व चौकशी केली असता तासभरापासून एकही एसटी आली नाही.

बाहेरून एसटी रिकाम्या जात असल्याचे निदर्शनास आले असता गाडी थांबवून बघितले, एका बसमध्ये फक्त १० ते १२ लाभार्थी दिसत होते. आमदार तनपुरे यांनी बस रिकामी चालली तर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास भाग पाडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe