विजेअभावी शेतकऱ्यांच्या पिकांसह विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा झाला खेळखंडोबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- विजेअभावी शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहे, तर दुसरीकडे वीजपुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे.

दरम्यान हि परिस्थिती नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन मध्ये निर्माण झाली आहे. कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याला आलेली पिके विहिरीत पाणी असूनही केवळ वीज नसल्याने देता येत नाही. जनावरांनाही पाणी देता येईना.

कोरोनामुळे ऑनलाइन असलेला अभ्यास वीज नसल्याने करता येईना. त्यातच ऑनलाइन स्कॉलरशिप परीक्षा चालू आहेत. मोबाइलच रिचार्ज होत नसल्याने परीक्षा कशा द्यायच्या. या समस्यांचा पाढा राशीन वीज उपकेंद्राचे सहायक अभियंत्याला चिलवडी (ता.कर्जत) ग्रामस्थांनी घेराव घातला होता.

चिलवडी गावाची वीज गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. राशीन वीज उपकेंद्राचे सहायक अभियंता संदीप जाधव यांना चिलवडी ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. ते तेथून निघून गेले. दोन-अडीच तासानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी महावितरणचे उपविभागीय अभियंता यांच्याशी संपर्क केला व मध्यस्ती केली.

चिलवडी गावची वीज पूर्ववत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थ वीज उपकेंद्रातून बाहेर पडले. सहायक अभियंता संदीप जाधव यांची राशीन येथून बदली करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24