अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील नद्या, धरणे, तलाव हि तुडुंब भरून वाहू लागली होती. दरम्यान आधीच मुसळधार पावसामुळे बळीराजा काहीसा हवालदिल झाला होता.
हे संकट संपते तोच पुन्हा एकदा आस्मानी संकट शेतकर्यां पुढे येऊन उभे राहिले आहे. दरम्यान पुणतांबा परिसरात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गहू, हरभरा, कांदा या रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यात झाल्या अवकाळी पावसामुळे अद्यापही परिसरातील ओढे, नाले, बंधारे तुंड्ब भरून वाहत आहेत. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण तसेच थंडी गायब झाल्यामुळे परिसरातील द्राक्ष बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान झाले तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकेही हातून जाण्याची वेळ आल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. पावसामुळे परिसरातील ऊस तोडीचे नियोजन विस्कळीत झाले आहे.