अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- अवैध गौण खनिज मुरूम व मातीची वाहतूक करणारे दोन डंपर उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर उपविभागीय कार्यालयाचे पथक बोटा परिसरात अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन संबंधी माहिती घेत होते. यावेळी अवैध मुरुमाची वाहतूक करणारा डंपर पथकाने पकडला.
चालकाचे नाव अशोक रामदास शिंगोटे व मालक अरुण किसन कुरकुटे (रा. कुरकुटवाडी ता. संगमनेर) असल्याचे ताबा पावतीत म्हटले आहे.
तर दुसरी कारवाई म्हसवंडी-आंबी दुमाला रस्त्यावर अवैध गौण खनिज मातीची वाहतूक करणारा डंपर पकडला. याप्रकरणी चालक किशोर नामदेव नेहे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) व मालकाचे नाव भिवा ढेरंगे (रा. आंबी दुमाला, ता. संगमनेर) याना तब्यत घेण्यात आले आहे.
दरम्यान दोनही वाहने घारगाव पोलीस ठाणे आवारात लावण्यात आली असून ही कारवाई नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांसह पथकाने केली. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले.