ग्रामपंचायतीवरील ‘प्रशासक राज’ मुळे होतेय ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. जे जिल्ह्याने पहिले आहे.

परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे. आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरूवात केली नसून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत असल्याचे चित्र यातून निर्माण झाले.

अशीच अस्तगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराची तक्रार आ. विखे यांच्याकडे आली आहे. अस्तगाव ग्रामपंचायतीची मुदत दि. 9 सप्टेंबरला संपल्यानंतर कारभार प्रशासक तसेच ग्रामसेवक यांच्यावर आला. प्रशासक आठवड्यातून एकदा ग्रामपंचायतीत येतात.

त्यांना तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींचा तसेच पंचायत समितीत ग्रामपंचायत विभागाचा कारभार पाहावा लागत आहे. त्यांना तालुक्यात तुलनेने मोठे असलेले गाव म्हणून ओळखले जाणारे अस्तगावला वेळ देता येत नाही. ग्रामविकास अधिकारी प्रशासकाच्या आड लपतात. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी अडवणूक होते.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नुकताच अस्तगाव दौरा झाला. त्याप्रसंगी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या तक्रारीचा पाढा वाचला. आमदार विखे पाटील यांनीही संबंधितांची कानउघाडणी केली. मुस्लिम कब्रस्तानमध्ये अजुनही पाणी आहे. सातमोर्‍याखालील पाणी कमी करण्यासाठी पर्याय का केला जात नाही?

अस्तगाव-पिंप्रीनिर्मळ रस्त्याच्याकडेने पाणीपुरवठ्याची पाईपलाईन नेली त्यामुळे या रस्त्याला साईडगटार करता आले नाही, साईड गटार करावे लागतील म्हणून पाईपलाईन काही अंतरावरून का करण्यात आली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24