अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या दुचाकींसह सर्व मोठ्या वाहनांची तपासणी करताना ते वाहन कोठून आले व कोठे चालले, याची माहिती घेतली जात आहे.
अन्य जिल्ह्यांतील वाहनांना थांबवून ठेवले जात आहे. असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात पाहायला मिळतो आहे. यामुळे वाहनधारकांची मोठे हाल होत आहे.
राहाता शहर शिर्डी नजीक असल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी देशातून लाखो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावतात.
साईबाबांचे दर्शन झाल्यानंतर राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी भाविकांना शहरातून जावे लागते. राहाता तालुक्यात वाहतूक शाखेचे कर्मचारी करोनाचे कारण पुढे करून
विनाकारण चार चाकी व दुचाकी वाहनधारकांची अडवणूक करून त्यांची पिळवणूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक शाखेच्या मनमानी कारभारामुळे वाहन धारकांची विनाकारण आर्थिक लूट होत असून
शहरातून जाणाऱ्या स्थानिक तसेच बाहेर गावातील वाहनधारकांना मोठा मनस्ताप होत आहे. पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची मनमानी वेळीच थांबून वाहनधारकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक , वीरभद्र मंदिरा समोरील परिसर, कोपरगाव नाका, राहाता बस स्थानक या ठिकाणी महामार्गावर वाहतुकीची नेहमीच कोंडी होते.
असे असतानाही वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी दूर करण्याकडे दुर्लक्ष करून चारचाकी व दुचाकी वाहनांने अडवण्यात मग्न असतात.