अहमदनगर बातम्या

मंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांमुळे तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग झाला मोकळा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राहुरी तालुक्यातील 14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

यामुळे अनेक तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ठीक ठिकाणी असणारी कार्यालय अडचणीची व अडगळीची होती. निधी मंजूर झाल्याने कार्यालय उभारणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे.

तालुक्यातील खडांबे बुद्रुक डिग्रस, धामोरी बुद्रुक, कात्रड ,सोनगाव ,निंभेरे,तांभेरे , कानडगाव , आरडगाव, उंबरे, कोंढवड, केंदळ बुद्रुक ,मानोरी ,पिंप्री वळण ,या गावांचा समावेश आहे.

प्रत्येकी एक तलाठी कार्यालय उभारणीसाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असून तलाठी कार्यालय सुसज्ज होणार आहेत.

जागेची अडचणी व नैसर्गिक आपत्तीचा सामना तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. आता प्रत्यक्षातच निधी उपलब्ध झाल्याने कार्यालयांना येणारी संकटाची मालिका संपुष्टात येणार आहे.

Ahmednagarlive24 Office