महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारची ‘ही’ योजना केली बंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- महाविकासआघाडी सरकारने याआधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्यांना पेन्शन देणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आणीबाणीच्या काळात आणीबाणीविरोधात आंदोलन करून तुरुंगवास भोगलेल्यांना देवेंद्र फडणवीस सरकारने दरमहा पेन्शन लागू केली होती.

मात्र महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून ही पेन्शन बंद केली आहे. १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तुरुंगवास भोगलेल्यांसाठी ही योजना होती.

एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मसिक दहा हजार व त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस पाच हजार व एक महिन्यापेक्षा कमी कारावास

भोगलेल्या व्यक्तींना मासिक रुपये पाच हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस रुपये अडीच हजार रुपये मानधन सुरू करण्यात आले होते.

राज्यातील ३२६७ जणांना याचा लाभ मिळाला होता. विशेष म्हणजे त्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांमध्ये भाजप आणि संघ परिवारातील व्यक्तींची संख्या अधिक होती.

त्यांचा सन्मान करण्यासाठी मागील सरकारने ही योजना सुरू केली होती. आता कोरोनाचे कारण देत ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड १९ या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनद्वारे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. या निर्बंधांमुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात घट होऊन

राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्यात येत आहे. प्रलंबित असलेले पैसे दिले जाणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24