अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक नद्या, तलाव, बंधारे, हे दुथडी भरून वाहिले, एवढेच काय तर वर्षानुवर्षे कोरडे असलेल्या विहिरी देखील भरल्या, यामुळे दुष्काळग्रस्त नगरचा डाग पुसला गेला.
मात्र पाण्याची मुबलकता असूनही जिल्ह्यातील प्रवरा नदीचे पात्र सध्या धोक्यात आले आहे. उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायी असलेली प्रवरा नदीची सध्या मोठ्या प्रमाणात गटारगंगा झाल्याची दिसून येत आहे.
पावसाळ्यानंतर अजून एकदाही आवर्तन न झाल्याने नदी असलेल्या पाण्यावर गावागावातून सोडलेल्या पाण्याचा नदीच्या साचलेल्या पाण्यावर तवंग आलेला दिसून येत आहे. या पाण्याचा वास देखील येत असल्याने नदीच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झालेली आहे.
अलीकडेच दसरा-दिवाळी यानंतर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ प्रवरा नदीत घरातील फुले कचरा थेट नदीत हे करत असल्याने दिसून येत आहे.
सध्या पावसामुळे सर्व बागायत क्षेत्र ओलिताखाली आहे, तसेच नदीचे पाणी अक्षरश दुर्गंधीयुक्त झालं आहे. तसेच या नदीची गटारगंगा झाल्याचे दिसून येते . त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पाऊल उचलून नागरिकांना पोटदुखी अशा भयानक आजारपासून वाचवावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved