अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. व पावसाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावली आहे.
या पावसामुळे अनेक समस्यां निर्माण झाल्या आहे. नुकताच जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने कोरेगाव, दुरगाव, राशीन, करपडी आदी भागातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. फळबागांचेही मोठे नुकसान झालेले आहे. या पिकांमध्ये ऊसाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
काढणीसाठी आलेला ऊस जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील करपडी गावानजीकच्या बेलवरा ओढ्यावरील पुल वाहुन गेला आहे.
त्यामुळे या मार्गावरून होणारा गावाचा संपर्क तुटला आहे, अशी माहिती विनोद देशमुख यांनी दिली. या आपत्तीमुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हतबल झाले आहेत. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved