दिवसभरात ‘ह्या’ तालुक्यात एकूण ८ कोरोना बाधित आढळले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होऊ लागले आहे. ग्रामीण भागांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.

जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही कोरोनाकचे रुग्ण वाढत चालले आहेत. काल दिवसभरात तालुक्यात एकूण ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

दिवसभरात अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील एक व शहरातील कारखाना रोडवरील एका पक्षाच्या पदधिकाऱ्यासह तीन असे चार जण पॅाझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिरा अहमदनगरहून प्राप्त झालेल्या

अहवालानुसार शहरातील कारखानारोड वरील हासे कॅाम्पलेक्समधील पूर्वीच्या बाधिताच्या कुटुंबातील एक ४४ वर्षीय महिला,

२४ व २५ वर्षीय दोन असे तीन व तालुक्यातील लहित येथील २६ वर्षीय महिला असे चार जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ५८ झाली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
    क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24