भरदिवसा दरोडेखोरांनी घरातील ऐवज केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथे शनिवारी भर दिवसा अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून किंमती ऐवज लंपास केला आहे. यावेळी दरोडेखोरांनी रोख रक्कम व सोनेचांदीच्या मौल्यवान ऐवज लंपास केला आहे..

दिवसाढवळ्या अशा चोरीच्या घटना घडू लागल्याने शहरासह संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्द येथील बबन उत्तम आंधळे हे शेतकरी राहत्या घरास कुलूप लावून शेतात कांदे लावण्यासाठी कुटुंबासह गेले होते.

या दरम्यान चोरट्याने फायदा घेत भर दुपारीच घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील समानाची उचकपाचक करून आठ ग्राम सोन्याचे कर्णफुले, सोन्याची 5 ग्रामची अंगठी, 7 ग्रामचा सोन्याचा गळ्यातील हार, चांदीच्या पायातील पट्ट्या, व रोख रक्कम असा एकूण 49 हजार रुपये किंमतीचा माल चोरट्यांनी चोरून नेला.

हा प्रकार सायंकाळी आंधळे कुटुंब शेतातून घरी आल्यानंतर उघडीस आला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र कोणीच फिरकले गेले नाही.

बबन आंधळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरांच्या विरोधात शेवगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24