दिवस ढवळ्या चोरटयांनी घर फोडून पावणेचार लाखांचा ऐवज लांबविला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे.

नुकतेच पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र हनुमान टाकळी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान मारुती शेलार यांचे कोपरे रस्त्यावरील राहते घर भरदिवसा फोडून पावणेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शेलार यांच्या मातोश्री साळूबाई शेलार दुपारी दोनच्या सुमारास पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी घर बंद करून गेल्या होत्या.

विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्यांना परत घरी येण्यास तासभराचा अवधी गेला. तीन वाजता घरी आल्यांनतर मागील दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटाची उचकपाचक झाली होती.

भरदिवसा चोरी झाल्याने एकच खळबळ माजली. याबाबत ज्योती मारुती शेलार यांनी पाथर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस पथकाने उशिरापर्यंत शोधकार्य राबविले. सहायक पोलीस निरीक्षक आर. डी. कायंदे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24