Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांत जमिनीला हादरे ! पत्रे, खिडक्यांचा खळखळाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या.

दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली.

श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या मातापूर, बेलापूर, पढेगाव सह अन्य परिसरात काल पहाटे तसेच सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान भूगर्भातून भूकंपासारखे धक्के जाणवल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली.

टिळकनगर परिसरासह रांजणखोल, दत्तनगर, एकलहरे या परिसरात काल सकाळी १० च्या दरम्यान व रात्रीच्या ९ व १० च्या सुमारास धक्के जाणवले. त्यामुळे घरातील पत्रे, पंखे, खिडक्यांसह अन्य वस्तूंना जोरदार हादरा बसल्याचे येथील नागरिक सांगतात.

राहुरी शहरासह तालुक्यात वांबोरी तसेच अन्य भागातही हादरे बसले. राहाता तालुक्यातही लोणी, बाभळेश्वर व अन्य काही ठिकाणी हादरे जाणवल्याचे सांगण्यात आले. नगर तालुक्यातील काही भागात हे हादरे जाणवले. केडगाव, सोनेवाडी आदी भागात खिडक्या, पत्रे खळखळले होते असे नागरिक सांगतात.

सायंकाळी जात प्रमाणात हे जाणवले असेही ग्रामस्थ सांगतात. दरम्यान के के रेंजमध्ये सराव सुरू असल्याने हे धक्के जाणवत असल्याचा अंदाज नागरिक बांधत आहेत. दरम्यान नागरिकांतून सध्या काल बसलेल्या हादऱ्यांमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. हे धक्के कसले होते याचा खुलासा प्रशासनाने करावा जेणेकरुन जनतेतील संभ्रम दूर होईल अशी मागणी नागरिक करत आहेत.