अहमदनगर बातम्या

खा. लोखंडेंच्या प्रयत्नामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होईल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : घाटमाथ्याचे पाणी मराठवाड्याला उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी संसदेत आवाज उठविला असून खासदार लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांना ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा खासदार लोखंडे यांनी संसदेत केली आहे.

सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी १५ टीएमसी पाणी मुळा गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापूर टाईप बंधारे बांधून या पाण्याचा उपलब्ध शेतकऱ्यांना कायमस्वरूपी केला जाऊ शकतो.

उर्वरित ५ टीएमसी पाणी अकोला, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असे एकूण २० टीएमसी पाणी शिर्डी मतदारसंघात उपलब्ध होऊ शकेल. असे झाल्यास शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गावाची पाणीटंचाई दूर होईल, असे काळे यांनी सांगितले

Ahmednagarlive24 Office