विकासकामांसाठी खा. विखेंच्या निधीतून ८६ लाख मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पाथर्डी शहरातील फुलेनगर भागातील पेव्हिंग ब्लॉक, माणिकदौंडी चौक ते भगवाननगर रस्ता काँक्रिटीकरण, भगवाननगर

येथील पगारेवस्तीवरील पुलाच्या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिली.

शहरातील विकास कामांची माहिती देताना पत्रकार परिषदेत आव्हाड म्हणाले, शहरातील फुलेनगर भागातील पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

माणिकदौंडी चौक ते भगवाननगर रस्ता काँक्रिटीकरणासाठी २५ लाख तर भगवाननगर येथील पगारेवस्तीवरील पुलाच्या कामासाठी 21 लाखांचा निधी खासदार निधीतून दिला आहे.

शहरातील विकास कामांसाठी ८६ लाख रुपयांचा निधी खा. डॉ.सुजय विखे यांच्या निधीतून मंजुर करण्यात आला आहे. मीडसांगवी ते भारजवाडी रस्त्याच्या कामासाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

विखे यांनी तसे पत्र जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने यांना दिले आहे. शहरातील विविध विकास कामांसाठी आणखी निधी देण्याचे विखे यांनी मान्य केल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24