अहमदनगर बातम्या

श्रीरामपूरात खा. लोखंडेची ८० कोटींची विकासकामे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तालुक्यात ८० कोटींचा निधी देणारे खा. सदाशिव लोखंडेंचा कामाचा झपाटा पाहता त्यांना पुन्हा खासदार करण्याची गॅरंटी मतदारांनीच घेतली आहे. देशात मोदी गॅरंटी महायुतीला निश्चितपणे ४०० पार केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील गावभेट जनसंवाद दौऱ्यात बोलत होते. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, बबनराव मुठे आदींसह भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय घटकपक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी कोल्हार, मालुंजा, भेर्डापूर, खोकर, भोकर, मुठेवाडगाव, नाऊर आदी गावांचा दौरा पार पडला. विविध संघटनांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करून जनसंवाद करीत खा. लोखंडे भेटी देत होते.

चित्ते म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार आपले सरकार आहे. जनसामान्यांच्या सर्व योजना शिर्डी मतदारसंघात राबविणारे कर्तृत्ववान खासदार सतत विकासात्मक कामावर भर देण्यासाठी निधी कमी पडू देत नाहीत. हीच आपली जमेची बाजू आहे.

आपण भविष्यात सुरक्षित जीवन हवे असेल तर मोदींना देशाचे नेतृत्व दिले पाहिजे. कारण त्यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडविला. तीन तलाकची प्रथा बंद केली. ३७० कलम हटविले. शेतमजूर शेतकरी, महिला सर्व समाजघटक विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम मोदींनी केले.

त्यामुळे खा. लोखंडे यांना पुन्हा लोकसभेत पाठविणे ही आपली जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेकजण आपल्यासोबत आहेत. त्यामुळे विकास कामासाठी केंद्र व राज्यातून निधी आणून विकासकामे करीत राहू.

यावेळी शिवसेना जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदिप वाघ, अमोल राऊत, राहुल धनवटे, गणेश काळे, नानासाहेब तनपुरे, बाबासाहेब कवडे, अरुण कवडे, जयंतराव कवडे, विजय टेकाळे, पोपटराव जाधव, दादासाहेब काळे, सुरेश गव्हाणे,

बाबासाहेब पटारे, मजिद पठाण, कैलास भनगे, सुरेश आसने, गिरिधर आसने, बाबासाहेब चिडे, श्रीकांत दळे, नितीन आसने, सतीश आसने, महेश मोदी, नानासाहब आसने, सुनिल शिंदे, प्रविण साळवे, दिलीप गायकवाड, रावसाहेब गायकवाड, काका शेळके,

सतीश शेळके, भाऊराव सूडके, समाधान विधाटे, रवि मते, ऋषीकेश झिने, गिरिष मते, सागर आहेर, काळु आहेर, दिंगबर शिरसाठ, भाऊसाहेब लोंढे, दिंगबर घोगरे, रंगनाथ गाढे, रामनाथ शिरसाठ, जालिदर कानडे, राजेंद्र चौधरी,

नाऊरचे स्वामी सहजानंद भारती देवस्थानचे स्वामी चैतन्यानंद भारती, उपसरपंच दिगंबर शिंदे, प्रतापराव शिंदे, विठ्ठलराव नांगळ, देविदास गहिरे, सुरेश देसाई, दिलीप देसाई, विजय नानेकर, प्रतापराव देसाई आदींसह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office