थोड्याच दिवसात राज्यातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पार पडणार असुन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झालेले खासदार निलेश लंके यांच्या निवडून आलेल्या खासदारकीमुळे
शेवगाव- पाथर्डी या विधानसभा मतदार संघात केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव बबनराव ढाकणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात असुन
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची उमेदवारी मिळवून त्यांचा लढण्यासाठीचा मार्ग सोपा झाला आहे, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे सुपुत्र अँड. प्रतापराव ढाकणे हे गेली अनेक वेळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरले असून भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा लढवली होती. परंतु त्यांना अपयश आले होते.
नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या लोकसभेमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगर दक्षिणमध्ये उमेदवारी करणाऱ्या लंकेंसाठी अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी दोन्ही तालुके पिंजून काढले असल्याने खासदार लंके यांच्या शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील मताधिक्या मध्ये ढाकणे यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे दिसून येते.
आता खासदार लंके येत्या विधानसभा निवडणुकीत अॅड. ढाकणेंच्या उमेदवारी व विजयासाठी प्रयत्न करुन अॅड. ढाकणे यांचा विधानसभेचा मार्ग सोपा करतील. अशी चर्चा नागरिकांतून होताना ऐकावयास मिळत आहे.