अहमदनगर बातम्या

आमदार रोहित पवार यांना रोखण्यासाठीच ‘ईडी’ची कारवाई ….! कार्यकर्त्यांनी केला निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील वर्चस्व रोखण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन ईडीसारख्या यंत्रणेमार्फत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई केली आहे.

या आकसबुद्धीने राजकीय अकसातुन केलेल्या कारवाईचा जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलतांना अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही पुर्ण ताकदीनिशी आ.रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचे सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा. मधूकर राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात पाटील, नगरसेवक मोहन पवार, अंजलीताई ढेपे, अँड. हर्षल डोके, प्रा.राजेंद्र पवार, प्रा.राहूल आहिरे ,दत्ता सोले, शहाजी राळेभात, राजेंद्र गोरे, उमर कूरेशी, तुषार डोके, बीलाल शेख , बाबासाहेब मगर, प्रमोद पोकळे, हरिभाऊ आजबे, वसीम सय्यद, अर्जुन नेटके, संभाजी राळेभात, दादा महाडिक ,काकासाहेब राळेभात, प्रकाश काळे, वैजनाथ पोले ,संजय डोके यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office