अहमदनगर Live24 टीम,13 सप्टेंबर 2020 :- यंदा जिल्ह्यात जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. सध्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून जिल्ह्यातील प्रमुख धरणेही भरली आहेत. त्यामुळे पाण्याचे प्रमाणही आता मुबलक असणार आहे.
त्यामुळे रब्बीची पेरणीही जास्त होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास सव्वा दोन लाखाने रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढेल असे गृहीत धरून
हंगामासाठी यंदा 57 हजार 500 क्विंटल बियाणाची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, कांदा, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी बियाणे शेतकर्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील,
असा विश्वास कृषी विभागाला आहे. एकंदरीत पाण्याची उपलब्धता पाहता रब्बी हंगामातील क्षेत्र मागील वर्षीपेक्षा तब्बल सव्वादोन लाख हेक्टरने वाढले आहे.
मागील वर्षी पाऊस कमी असल्याने एकूण पाच लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा त्यात वाढ होऊन हे क्षेत्र सरासरी सव्वासात लाख हेक्टरपर्यंत प्रस्तावित केले आहे.
त्यानुसार आवश्यक बियाणे तसेच खतांचा पुरवठा करण्याबाबत खबरदारी कृषी विभागाने, तसेच जिल्हा परिषदेने घेतली आहे. तसेच रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने 2 लाख 79 हजार मेट्रिक टन खतांची मागणी शासनाकडे केली आहे.
त्यात 1 लाख 8 हजार टन युरिया खताचा समावेश आहे. खरीप हंगामात युरियाची टंचाई अनेक शेतकर्यांना भासली होती. त्यामुळे रब्बी हंगामात अशी टंचाई भासू नये याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved