अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंध लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच जिल्ह्यातील अनके ठिकाणी लसीकरण करण्यात आले.
मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडला देखील मात्र आत एक नवीनच समस्या उद्भवली आहे. जिल्ह्यात शनिवारपासून (ता. 16) कोरोना लसीकरणास सुरवात झाली.
पहिल्या दिवशी 1200 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. पैकी 871 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यातील चौघांना लस दिल्यानंतर किरकोळ त्रास जाणवला.
मात्र, त्यामुळे लसीबाबत कोणीही भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील चार केंद्रांवर 261, तर ग्रामीण भागातील आठ केंद्रावर 610,
असे एकूण 871 (72 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरणानंतर चौघांना किरकोळ त्रास जाणवला.
मात्र, कुठलीही लस घेतल्यानंतर असा त्रास काहींना जाणवतो. त्यामुळे कोरोना लसीबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.