आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक,अपघातात एक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- संगमनेर-लोणी रस्त्यावरील कोंची शिवारातील महामार्गावर गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास आयशर व कंटेनरची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.

आयशर (एमएच १५ एफव्ही ५५९५) व कंटेनर (आरजे १४ जीडी ३७६८) यांची धडक इतकी भीषण होती की, आयशर चालक खंडू रामा वीर (वय ३५, गाडेकरवाडी, ता. ओझर, जि. नाशिक) हा जागीच ठार झाला.

या अपघात प्रेमचंद काशीराम राजपूत (वय ३४), दीपक राजपूत (वय २५, दोघेही राजस्थान), तर मंगेश घनश्याम येवले (पिंपळगाव बसवंत, ता. निफाड) हे तिघेजण गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती आश्वी पोलिसांना कोंची येथील जयंवत गिते यांनी फोनवरून देताच पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, हवालदार मच्छिंद्र शिरसाठ, विनोद गंभिरे,

रवींद्र भाग्यवान, संतोष शिंदे, प्रदीप साठे, प्रवीण रणधिर, प्रसाद सोनवणे, अनिल शेगाळे हे तत्काळ दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना संगमनेर

येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. नंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24