अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अस्तगाव ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 79 इच्छुकांनी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर न केल्याने अनेक दिग्गजांनी निवडणुकीकडे पाठ फिरविली आहे.
या निवडणुकीचे चित्र 4 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. 4 जानेवारी हा माघारीचा अंतिम दिवस आहे. या निवडणुकीत जनसेवा मंडळ, लोकसेवा मंडळ या विखे समर्थकांच्या दोन्ही पॅनलसह काही तरुणांनांनी एकत्र येवून अस्तगाव युवा ग्रामविकास मंडळ या नावाने स्वतंत्र पॅनल उभा केला आहे.
त्यांनी 17 पैकी 16 जागी उमेदवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेसने तीन जागी आपले उमेद्वार उभे केले आहेत. यातील काँग्रेस वगळता सर्वच गट विखे पाटील यांना मानणारे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागी आपले उमेद्वारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची जनसेवा बरोबर युतीची शक्यता आहे. जनसेवा हे प्रमुख मंडळ म्हणुन पुढे आले आहे.
या मंडळा बरोबर लोकसेवाची युती होणार का? याची चर्चा सध्या सुरु आहे. युवकांनी पॅनल उभा केल्याने बिनविरोधाच्या आशा मावळल्या आहेत.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना गावातील काही प्रमुखांना ही निवडणूक बिनविरोध करता आली तर बघा, कटूता टाळा असा सल्ला दिला होता. परंतु इच्छुकांनी घाई केल्याने बिनविरोध होण्याबाबत साशंकता आहे