अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर आज 18 जानेवारी रोजी मतमोजणी झाली.
जिल्ह्यात अनेक दिग्गजांनी आपली जादू दाखवत ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले. दरम्यान जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. शिरसाठवाडी येथील ग्रामपंचायतीत एकूण 9 जागा होत्या.
या सर्व जागांवर अविनाश पालवे यांचे पॅनल निवडून आले आहे. त्यामुळे आता शिरसाठवाडी ग्रामपंचायतवर मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांची सत्ता आली आहे. अविनाश पालवे यांनी राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अर्जुन शिरसाठ यांचा दारुण पराभव केला आहे.