अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे.
त्यातच पाथर्डी तालुक्यात देखील बिनविरोध निवडणूक पाहायला मिळू लागल्या आहेत. पाथर्डी तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींपैकी तीनखडी, सोमठाणे खुर्द व खेर्डे तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.
सदस्यपदाच्या जागेसाठी 2425 उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी 53 अर्ज छाननीत बाद झाले. तर 872 उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले. 105 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
उर्वरित 575 सदस्यांच्या जागांसाठी 1321 जण निवडणूक रिंगणात आहेत. कासार पिंपळगाव, अकोला, खरवंडी, माणिकदौंडी, मिरी, सुसरे, हनुमानटाकळी, आल्हनवाडी, तोंडोळी, दैत्यनांदूर, येळीमध्ये राजकीय संघर्षाची शक्यता वर्तविली जात आहे.
मिरी व येळीध्ये तिरंगी तर अकोला, माणिकदौंडी, कासार पिंपळगाव, खरवंडी, हनुमान टाकळी, आल्हनवाडी येथे दुरंगी लढती गाजणार आहेत.