अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक पार पडली.
कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्ष पदी माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांचे अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवार दि.2 फेब्रुवारी रोजी 11 वाजता कारखाना अतिथीगृहात संपन्न झाली.
अध्यक्ष पदासाठी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील व माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांचे एक एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.