अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर येथील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेरीस ही प्रतीक्षा संपली असून ही निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
जागतिक किर्तीचे धार्मिक स्थळ असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी भागवत सोपान बानकर यांची तर उपाध्यक्षपदी विकास नानासाहेब बानकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील महिन्यात नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती.
माजी सरचिटणीस दिपक दरंदले यांनी बोलविलेल्या बैठकीत अध्यक्ष बानकर यांच्या नावाची सुचना अप्पासाहेब शेटे यांनी केली. त्यास विकास बानकर यांनी अनुमोदन दिले. इतर कोषाध्यक्षपदी दिपक दादासाहेब दरंदले, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीस अप्पासाहेब शेटे यांची निवड झाली आहे.
नूतन पदाधिकार्यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.