अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-जामखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी शुक्रवारी प्रभाग आरक्षण जाहीर केले. आरक्षणामुळे अनेकांच्या अपेक्षा भंगल्या. तथापि, युवा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कही खुशी आणि कही गम असे वातावरण सध्या आहे. प्रभाग १ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग २ सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती,
प्रभाग ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ७ सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ अनुसूचित जाती महिला, प्रभाग ९ सर्वसाधारण व्यक्ती,
प्रभाग १० सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग १२ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग १३ सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग क्रमांक १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती,
प्रभाग १६ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग १८ सर्वसाधारण महिला, प्रभाग १९ सर्वसाधारण महिला, प्रभाग २० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग २१ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, असे आरक्षण जाहीर झाले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved