अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नगर अर्बन कोपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यामुळे बँकेचे खातेदार, व्यापारी, कर्जदार, ठेवीदार, सभासद यांना अडचण होत आहे.
बॅंकेला पूूूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त व्हावे यासाठी सभासदांचा हक्काचा प्रतिनिधी हवा आहे. त्यामुळे तात्काळ प्रशासक हटवण्यात येऊन निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी भाजपचे अल्पसंख्याक प्रदेशउपाध्यक्ष सलीम बागवान यांनी केली आहे.
यावेळी अनिल महेर, ताालुका सरचिटणीस प्रविन चोरडीया, संघटक मनोज कुलकर्णी, पोपट राळेभात, मुज्जंफर आतार आदी उपस्थित होते.