वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : वीज मिटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याप्रकरणी शैलेंद्र गुलाब दुबे (रा. बागरोजा कॉलनी, सावेडी) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.३) गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे प्रमुख आशिष नरेंद्र नावकार यांनी फिर्याद दिली आहे. नावकार यांच्यासह भरारी पथकातील अधिकारी व कर्मर्चायांनी २७ फेब्रुवारी रोजी दुबे याच्या घरी तो वापरत असलेल्या वीज मिटरची तपासणी केली असता

त्यांना वीज चोरीचा संशय आला. त्यांनी वीज मिटर नगरच्या चाचणी कक्षात पाठविला. चाचणी कक्षात तपासणी केली असता वीज मिटरमध्ये छेडछाड केल्याचे समोर आले आहे. दुबे याने महावितरण कंपनीची सुमारे १९ महिन्यात १०७३ युनिटची वीज चोरी केली असून

त्याची किंमत अधिभारासह १६ हजार २२० असून तडजोड रक्कम दोन हजार होती. सदरची रक्कम न भरल्याने दुबे विरोधात विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe