अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या चरित्रामधून देश सेवा व देश प्रेमाची प्रेरणा युवकांनी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यातील गुण आत्मसात करुन देश विकासासाठी योगदान द्यावे.
नेताजी विषयी जागृतीचे काम एन.एस. एस. द्वारे होत आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर उपकेंद्र संचलक प्रो.डॉ.एन.आर.सोमवंशी म्हणाले.
अहमदनगर महाविद्यालयातील एन.एस.एस.एस विभागातर्फे नेताजी सुभाष चंद्रबोस जयंती निमित्त पराक्रम दिवस साजरा करण्यात आला. या अंतर्गत महाविद्यालय स्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अहमदनगर उपकेंद्र संचलक प्रा.डॉ. एन. आर. सोमवंशी तर अध्यक्ष म्हणून रजिस्टार ए.वाय.बळीद उपस्थित होते.
यासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ.बी. एम. गायकर, उप प्राचार्य डॉ. ए.व्ही. नागवडे, उपप्राचार्य डॉ सय्यद रज्जाक यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात ईटीआय प्रमुख डॉ.शरद बोरुडे, डॉ.गोकुळ गायकवाड उपस्थित होते.
यात परीक्षक म्हणुन प्रा. फरहान शेख यांनी काम पाहिले. या स्पर्धेमधील विजते प्रथम – श्वेता खरात, द्वितिय- वैभव अनारसे, तृतीय- दिव्या केदारे, उत्तेजनार्थ- रेणुका मदने, शिवानी बोरुडे, शाम ढाणके यांना प्राप्त झाले.
या कार्यक्रमात प्रस्तावना कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे, सुत्रसंचालन कशवी जांगला, पाहूण्यांचा परिचय शिंदे विनय, आभार धिवर रोहित यांनी मानले.