श्रीगोंद्यातील ‘या’ पतसंस्थेत 54 लाख 18 हजारांचा अपहार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : भ्रष्टाचाराचे प्रमाण आणि आर्थिक गैरकारभाराचे प्रकार अनेक आर्थिक संस्थांमध्ये उघडकीस येत आहेत.

असाच एक गैरकारभाराचा प्रकार सहकार महर्षी काष्टी सोसायटीमध्ये झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता काष्टीत असणाऱ्या धनश्री महिला ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.

(काष्टी ता. श्रीगोंदा) मध्ये 54 लाख 18 हजारांचा अपहार झाल्याची तक्रार नोंदवली गेल्याने खळबळ उडाली आहे. काष्टी येथील धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत काष्टी या संस्थेच्या चेअरमन ज्योती रमेश गवळी ,

त्यांचे पती रमेश सर्जेराव गवळी व संस्थेचे मॅनेजर भारत सदाशिव डोईफोडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन संगनमताने ठेवीदार यांनी संस्थेकडे जमा ठेवलेल्या

ठेवीच्या पैशातून ठेवीदार यांचा विश्वासघात करुन ५४ लाख १८हजार ४६ रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केला म्हणुन त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिसात शासकीय लेखापरीक्षक सर्जेराव जामदार यांनी गुन्हा दाखल केला आहे.

शासकीय लेखापरीक्षक असणारे जामदार यांना काष्टी येथिल धनश्री महीला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मयादीत काष्टी या संस्थेचे दि .26 / 09 / 2013 ते 31/03/2018 या मुदतीचे लेखापरीक्षण करण्याबाबत आदेश देण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24