शांतता प्रिय निवडणुकीसाठी त्यांना आवर घाला; पोलीस अधीक्षकांना साकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहे.

जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत. दरम्यान निवडणूक म्हंटले कि, वादविवाद होणे स्वाभाविक आहे.

याच अनुषंगाने भाजपच्या वतीने एक मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी

सदर गावामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार व अवैध व्यवसायात गुंतलेल्या व गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावामध्ये /तालुक्यामध्ये येण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे.

जेणे करून सदर गावातील निवडणुका शांतताप्रिय मार्गाने पार पडतील असे निवेदन भाजपच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक याना देण्यात आले आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,युवराज पोटे ,शामराव पिपळे ,दिलीप भालसिंग ,गणेश भालसिंग ,सचिन भालसिंग ,अंबादास बोठे आदी उपिस्थत होते .

निवडणुकांच्या काळामध्ये कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण होऊ नये व शांतता प्रिय निवडणुका होण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे यावेळी निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24