सरकारी जागेवरील अतिक्रमण भोवले; जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-सरकारी जागेत अतिक्रमण केल्याबाबत मोमीन आखाडा (ता. राहुरी) येथील उपसरपंच रंजना सोपान शिंदे आणि सदस्य चंद्रकांत दत्तात्रय कोहकडे व शेख अल्लाउद्दीन याकुब यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मोमीन आखाड्याचे सरपंच अशोक गेणु कोहकडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपसरपंच आणि दोन सदस्य यांनी गावामध्ये अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी केली होती.

अर्जदार सरपंच अशोक कोहकडे यांच्या वतीने अ‍ॅड. योगेश गोरंगे यांनी युक्तिवाद केला. कायदयानुसार सरकारी जागेवर अतिक्रमण करणे अथवा अतिक्रमण करुन बांधकाम केल्यास ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद आहे.

यानुसार उपसरपंच रंजना सोपान शिंदे, ग्रामपंचायत सदस्या चंद्रकला दत्तात्रय कोहकडे, शेख अल्लाउद्दीन याकुब यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले.

जिल्हाधिकार्‍यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून उपसरपंच आणि दोन सदस्यांना अपात्र ठरविले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24