राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर शिरसाठ यांची निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर चंद्रहास शिरसाठ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दिदी दुहन यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खा. तथा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेशप्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व नाशिक विभागीय अध्यक्ष चिन्मय गाढे यांनी हे नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण,

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दिदी दुहन यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या विकासात भरीव कार्य करावे व पक्ष संघटना मजबूत करावी,

असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. इंजि. सुधिर शिरसाठ हे शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द या छोट्याशा खेडेगावातील रहिवासी असून त्यांनी मुंबईतील विद्यावर्धिनीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून बी. इ. कॉम्प्युटर ही पदवी मिळवली असून वयाच्या २१ व्या वर्षांपासून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. दहावी बारावीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन चर्चासत्र, ७ जि. प.शाळेतील विद्यार्थांना जीवनावश्यक वस्तू व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम,

मकरसंक्रांतोत्सव, सांगली पूरग्रस्तांना प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन मदत व स्वच्छता मोहिम असे अनेक उपक्रम राबविले. सुराज्य रूरल डेव्हलपमेंट फौंडेशनचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वडुले खुर्द व पंचक्रोशीतील गावातील जनतेसाठी ना नफा ना तोटा या तत्वावर कोरोना महामारीच्या संकटात व लॉक डाऊनच्या काळात रास्त दरात किराणा मालाचे वाटप करून सर्व सामान्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्यातील हा पहिला यशस्वी प्रयोग ठरला. ऐन पिके बहरत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होत नव्हता. अशा परिस्थितीत राज्य स्तरावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तात्काळ संपर्क करून तालुक्यातील अनेक गावांना पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध करून दिला.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील गोर गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना युरिया चे घरपोहोच मोफत वाटप करून नेत्यांचा वाढदिवस साजरा कसा करावा याचा आगळावेगळा आदर्श राज्यात घालून दिला. तर दिवाळीच्या काळात निराधार मुलांना जीवनाश्यक वस्तूंच्या किट चे मोफत वाटप केले. तसेच सांगलीतील पूरग्रस्त भागातील निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

प्रारंभीच्या काळात शेवगाव तालुक्यात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या परंतु शासन योजनेस पात्र नसलेल्या हुशार विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे खासगी कंपन्या व अनेक स्वयंसेवी संस्था देत असलेल्या शिष्यवृत्ती योजनेबाबत मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे अनेक लोक उपयोगी उपक्रम राबविले.याचबरोबर पक्षहितासाठी ग्रामपंचायत पासून ते थेट विधानसभा व लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

राज्यस्तरावरील अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, उप मुख्यमंत्री अजित दादा पवार व खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.

या कामी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज दादा चव्हाण व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या निवडीबद्दल खा. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज दादा चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व इतर पदाधिकाऱ्यांनी तसेच सुराज्य रुरल डेव्हलपमेंट फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करून मी पाठीमागील दीड वर्षापासून राबविलेल्या सर्व सामाजिक उपक्रमाचा व पक्षाहितासाठी केलेल्या कामाचा सन्मान केला आहे. भविष्यात सर्वसामान्य जनतेसाठी अधिक जोमाने व ताकदीने काम करता यावे यासाठी पक्षाने माझी नियुक्ती केली. त्यामुळे आता माझी समाजाप्रती असणारी जबाबदारी अधिक वाढली आहे.

याची देखील जाणीव मला पक्षाने करून दिली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात ८०% समाज कारण व २०% राजकारण या तत्वानुसार मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाच्या माध्यमातून राज्यभरातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नावर काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न समजावून घेण्यासाठी मी लवकरच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत, पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहे असे इंजि. सुधिर शिरसाठ म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24