अहमदनगर बातम्या

राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मराठा समाजाला जोपर्यत अरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना आखतवाडे गावात प्रवेश बंदचा ठराव सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब तुम्हारे साथ है अशा घोषणा देत हा पाठिंबा दर्शविला.

यावेळी बोलताना रघुवीर उगले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु सरकारने या गोष्टीचे गांभीर्य घेतले नसून एक सर्वसामन्य कुटुबांतील मराठा तरूण आरक्षणाच्या मागणीसाठी अहोरात्र झटतोय व मराठा समाजाला एकसंघटित करून त्यांना

त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी लढा देतोय अशा मराठा बांधव मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी मराठा समाज बांधव खंबीरपणे उभा आसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आखतवाडे येथील सकल मराठा समाज बांधव रघुवीर उगले, ज्ञानेश्वर उगले, संजय उगले, प्रताप घाडगे,

केशव उगले, गणेश भागवत, रविंद्र राशिनकर, सुनिल उगले, रामेश्वर उगले, हरीभाऊ उगले, संतोष झावरे, बिभिषण उगले, संतोष उगले, संजय साळवे, धनंजय उगले, सोमनाथ उगले, शरद गवांदे, नवनाथ उगले, रहीम शेख, सुखदेव काळे, हर्षल उगले, प्रविण उगले, बळीराम उगले, संदीप आठरे आदी उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office