Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील बिरेवाडी ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण समर्थनार्थ सरसावले असून आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यांना,
लोकप्रतिनिधींना बिरेवाडी गावात प्रवेश दिला जाणार नाही. अशी घटना उद्भवल्यास संबंधित पक्ष नेता, लोकप्रतिनिधीच यास जबाबदार असेल, असा इशारा बिरेवाडी ग्रामस्थांनी दिलेला आहे.
याप्रसंगी वन अधिकारी दामोधर सागर, आण्णासाहेब ढेंबरे, बाजीराव ढेंबरे, भास्कर ढेंबरे, संतोष सागर, एकनाथ ढेंबरे, राजेंद्र ढेंबरे, मालक सागर, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष राहुल ढेंबरे यांच्यासह आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र अध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी ग्रामस्थांना मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यात शांततामय मार्गाने गाव बंदी करुन आरक्षण लढाईत आपला खारीचा वाटा उचलावा व मनोज जरांगे यांना बळ द्यावे.
सरकारने सकल मराठा समाजाचा व मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता, संयमाचे प्रतिक ठरलेल्या आंदोलनाला न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना ढेंबरे यांनी दिली.