अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- कोरोनाबाधित रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा खासगी रुग्णालयाकडून मोठ्याप्रमाणात अतिरिक्त रकमेची बिले आकारण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले आहे.
समितीने तपासणी केलेल्या बिलांपैकी आजपर्यंत १० रुग्णालयांच्या ५५ बिलांमध्ये त्रुट आढळून आल्या आहेत. तर आठ रुग्णालयांकडून ८ लाख ६३ हजार ३३३ रुपयांची जादा रकमेची रिकव्हरीही नोंदविण्यात आल्याचे समितीच्या अध्यक्षा तथा उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गठीत केलेल्या समितीकडून खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणार बिलांची तपासणी सुरू आहे. २९ खासगी रुग्णालयांमध्ये आजपर्यंत १६९१ रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यातील १२४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
समितीकडे यापैकी २११ बिले तपासणीसाठी प्राप्त झाली आहेत. त्यापेकी ८० बिलांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ५५ बिलांमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत. रुग्णालयाकडन आकारण्यात आलेला बिलांमध्ये ८ लाख ६३ हजार ३३१ रुपयांची अधिकची रक्कम रिकव्हर म्हणून नोंदविण्यात आली.
दरम्यान, काही रुग्णालयांकडून वारंवार मागणी करुनही बिले सादर झालेली नाहीत. तसेच उर्वरित बिलांची तपासणी सुरू आहेत. ज्या बिलांमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत त्यांच्या रिकव्हरीच्या रकमेबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी निर्मळ यांनी सांगितले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved