स्व.अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- नगर शिवसेनेचा वाघ दिवंगत नेते अनिल भैय्या राठोड यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

नगरकरांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे अनिल भैय्या यांच्या स्मृती नगर शहरामध्ये कायम राहाव्यात, यासाठी जननायक स्व.अनिलभैय्या राठोड विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबतची माहिती मंचाचे संस्थापक निमंत्रक अनिकेत कराळे यांनी दिली आहे. अनिकेत कराळे यांच्यासह ऋतुराज आमले, मनोज चव्हाण, तुषार लांडे यांचा मंचाच्या उभारणीमध्ये प्रमुख पुढाकार आहे.

याबाबत माहिती देताना कराळे म्हणाले की, आम्ही गेली अनेक वर्ष अनिलभैय्या या व्यक्तीमत्वावर मनापासून भरभरून प्रेम केले. अनिलभैय्या यांचे कार्य हे कायम मला आणि या शहरातल्या युवा पिढीला भारावून टाकणार होतं.

विशेषत: त्यांच्यामध्ये असणारी प्रखर हिंदुत्वाची भावना ही या शहरातील तरुण पिढीला कायम आकर्षित करायची. दुर्दैवाने अनिलभैय्या यांचे अनपेक्षितपणे निधन झाले.

अनिलभैय्या हयात नसले तरी देखील त्यांचा विचार नगर शहरामध्ये कायम जिवंत राहावा यासाठी आम्ही त्यांच्या नावाने विचार मंचाची स्थापना केली आहे.

या विचार मंचाच्या माध्यमातून त्यांची जयंती, पुण्यतिथी, त्याचबरोबर त्यांना अभिप्रेत विविध सामाजिक उपक्रम आम्ही आयोजित करणार आहोत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24