अहमदनगर बातम्या

दोन लग्न झाले तरीही त्याने तिसरीशी संबंध ठेवले….तरुणी प्रेग्नेंट झाली

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याने तिची गर्भधारणा झाली. त्यामुळे तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या दिल्या.

त्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वडीलासह नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 21 वर्षीय तरूणीला सईद बेग याने लग्नाचे आमिषदाखवून प्रेमसंबंध ठेऊन तिच्या इच्छे विरूध्द तिच्यावर अत्याचार केला.

त्या तरूणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली असता त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे सांगा सदर तरुणीची फसवणूक केली.

यातून ती तरूणी गर्भवती झाली. तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भ पाताच्या गोळ्या दिल्या. तरूणीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office