अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीपूर्वीच भाजपमधील वाद चव्हाट्यावर! ‘या’ कारणामुळे आ.मोनिका राजळे समर्थक व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद

Published by
Ajay Patil

Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत असून ती जशी महाविकास आघाडीमध्ये आहे तशीच महायुतीमध्ये देखील आहे. या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असल्यामुळे नेमके तिकीट कोणाला द्यावे? याचा पेच सगळ्या पक्षांसमोर आहे.

त्यातल्या त्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत असल्यामुळे देखील काही भाजप नेत्यांची अंतर्गत खदखद सुरू असून प्रत्यक्षात त्यासंबंधीचे वक्तव्य देखील बऱ्याच भाजप नेत्यांनी केल्याचे आपण पाहिले. परंतु जर भाजपच्या दृष्टिकोनातून विचार केला तर  अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गतच इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे भाजपने आता पक्षांतर्गत इच्छुकांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.

अशाच प्रकारची निवडणूक प्रक्रिया ही नगर जिल्ह्यातील नगर विधानसभा व शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी दोन ठिकाणी स्वतंत्रपणे राबविण्यात आली. या प्रक्रियेमध्ये नगर विधानसभेकरिता आठ व शेवगाव- पाथर्डी विधानसभेसाठी तीन असे भाजपचे उमेदवार होते.

परंतु या सगळ्या मतदानाप्रसंगी काही पदाधिकाऱ्यांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून आमदार मोनिका राजळे समर्थक व भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे व गोकुळ दौंड यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. इतकेच नाही तर ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशा पद्धतीचे मागणी देखील करण्यात आली.

 भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत असलेल्या भाजपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (राष्ट्रवादी गट) यांना सोबत घेतल्यामुळे अंतर्गत खदखद सुरू असतानाच भाजपने आता पक्षांतर्गत इच्छुकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील नगर विधानसभा व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवारी दोन ठिकाणी स्वतंत्रपणे मतदान प्रक्रिया राबवली.

नगर विधानसभेसाठी ८ तर शेवगाव-पाथर्डी साठी ३ असे भाजपचे उमेदवार होते. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या इच्छुकांच्या मतदान प्रक्रिये दरम्यान पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांची नावे मतदानासाठी वगळल्याच्या मुद्द्यावरून आमदार मोनिका राजळे समर्थक व भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंडे, गोकुळ दौंड यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात वाद झाला.

निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी मुंडे, दौंड समर्थकांनी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमधील निष्ठावंत विरुद्ध अन्य पक्षातून दाखल झालेल्या नेत्यांत संघर्ष उभा राहिला आहे. दरम्यान, नगर विधानसभा मतदारसंघासाठी ही मतदान झाले. या विधानसभेसाठी ६ इच्छुकांसाठी ९४ जणांनी मतदान केले. शेवगाव – पाथर्डीसाठी तीन इच्छुकांसाठी १२५ जणांनी मतदान केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहावर पक्ष निरीक्षक विजय साने यांच्या उपस्थितीत शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप इच्छुकांसाठी चिठ्ठी पद्धतीद्वारे मतदान घेण्यात आले.

या मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार राजळे, भाजपचे प्रदेश सचिव अरुण मुंढे, गोकुळ दौंड इच्छुक होते. यातील इच्छुकांसाठी चिठ्ठीद्वारे १२५ पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. मतदान प्रक्रिये दरम्यान प्रदेशला पाठवण्यात आलेल्या मतदारांच्या यादीत तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांचे नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून राजळे समर्थक व मुंढे, दौंड यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत वाद झाला.

या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी यावेळी मुंढे, दौंड यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याच गोंधळात पक्षनिरीक्षकांना निवडणूक प्रक्रिया आटोपती घ्यावी लागली.

विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया दरम्यान कुठलाही गोंधळ झाला नाही, असे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी सांगितले.

नगरसाठी ८ इच्छुक 

नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी बंधन लॉन्स येथे इच्छुकांसाठी पक्ष निरीक्षक महेश हिरे यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपकडून शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे,

वसंत लोढा, राजेंद्र काळे,मुकुंद देवगावकर, सचिन पारखी व ज्योती दांडगे या आठ इच्छुक उमेदवारांसाठी २६६ मतदारांपैकी ९४ जणांनी मतदान केले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी सुचवलेले इच्छुक उमेदवारांच्या नावाची बंद पाकिटे पक्ष निरीक्षक महेश हिरे प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करणार आहेत.

Ajay Patil