पंतप्रधान दौऱ्याआधीच अहमदनगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पेटला ! महसूलमंत्री विखेंनी स्पष्टच सांगून टाकलं…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : उद्या पंतप्रधान मोदींचा अहमदनगर जिल्ह्यात दौरा आहे. ते शिर्डीत येणार आहेत. साईबाबांच्या मंदिरातील नवीन दर्शन रांगेचे उदघाटनासह विविध कार्यक्रम त्याठिकाणी होणार आहेत.

दरम्यान त्या आधीच अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. यात महत्वाचा मुद्दा समोर प्रकर्षाने समोर आणला जात आहे तो म्हणजे जिल्हा विभाजनाचा.

आता याबाबत महसूल मंत्री विखे यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, जिल्हा विभाजनाचा कोणताही निर्णय अद्यापही झालेला नाही. ज्यावेळी जिल्हा विभाजनाचा विषय येईल, त्यावेळी आपण एकत्र येत सर्वांना विश्वासात घेत एकमुखी निर्णय घेऊ.

परंतू सध्या विनाकारण जिल्ह्याच्या प्रश्नावर भूस पांगविण्याचा प्रकार सुरू आहे असा घणाघात विखे यांनी केला. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात आयोजित भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी इंद्रभान थोरात, नितीन दिनकर, नानासाहेब पवार, दीपक पटारे, शरद नवले, गिरीधर आसने, रामभाऊ तरस, सुनील साठे, गणेश राठी, मारूती बिंगले, गणेश मुदगुले अधीन अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

विखे पाटील यांनी येथे संवाद साधताना आमदारांनाही लक्ष केले. ते म्हणाले की, श्रीरामपुरात ज्यावेळी उद्योग येत होते, तेव्हा त्यात हस्तक्षेप करत उद्योग कुणी पळवून लावले ? या सर्व गोष्टी श्रीरामपुरकर विसरले आहेत असे सांगत

त्यावेळी येथील अनेक लोक सत्तेत होते. यामागे तालुक्यातील आमदारही राहिले आहेत. त्यांनी येथे उद्योग आणण्यासाठी काय प्रयत्न केले असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या लोकांना बाकीचेच उद्योग एवढे होते की, श्रीरामपुरमध्ये उद्योग आणायला त्यांना वेळच मिळाला नाही असाही टोला त्यांनी लगावला. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी उद्योग आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याबाबत आपण वरिष्ठांची बैठकही बोलाविल्याचे त्यांनी सांगितले.