कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेतकरी पाण्यापासून वंचित

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पैठण उजवा कालव्यात पाणी सुटून जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असून, कालव्यात पाणी असतानाही केवळ विजेअभावी शेवगाव तालुक्यातील हातगाव व कांबी परिसरातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत.

दिवसाआड होणाऱ्या वीजपुवठ्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही तसेच वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.’

मुंगी, हातगाव व कांबी, या तीन गावांसाठी हातगाव येथे विज महावितरण कंपनीने स्वतंत्र ३३ के.व्ही.चे. वीज उपकेंद्र सुरू केलेले आहे. मात्र, या केंद्राची निर्मिती होत असताना त्या वेळच्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने हातगाव येथील विज उपकेंद्रातून तीन गावांना पूर्णदाबाने वीज मिळत नाही.

त्यामुळे वीज उपकेंद्राची निर्मिती झाल्यापासून दररोज दिवसाआड विज पुरवठा होत असून, त्यामध्ये सुधारणा व्हावी, म्हणून या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने छेडली. मात्र, त्यामध्ये आजपर्यंत काहीच बदल झाला नसल्याने त्याचा मोठा त्रास शेतकऱ्यांना आजही सहन करावा लागत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, परिसरातील सर्वच ठिकाणचे पाण्याचे स्रोत आटले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. परिसरात पाणी टंचाई जाणवत असताना पैठण जलाशयातून उजव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्यात आले असून, हा कालवा माजलगाव जलाशयात नेऊन झिरो केला असल्याने कालव्यातील पाण्यामुळे शेकडोच्यावर गावांना त्याचा मोठा फायदा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe