शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील – छगन भुजबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन आवर्तन देता येईल का याची पडताळणी करून त्याप्रमाणे कार्यवाही करावी तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहाता येथे केले.

दरम्यान राहाता येथील पाटबंधारे विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे, माणिकराव कोकाटे, आशुतोष काळे, लहू कानडे, सुधाकर रोहम,

पदमकांत कुदळे, कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधाणे, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अर्थचक्राला अधिक गती मिळाल्यानंतर विकासकामे अधिक वेगाने करण्यास सुरुवात झाली आहे.

कालवा दुरुस्तीतेची कामे प्राधान्याने केले जातील. शेटवच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. पाणी साठा वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात दोन च्या ऐवजी तीन आवर्तन देण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील ,आ.लहू कानडे ,आ.माणिकराव कोकाटे ,यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. केंद्र व राज्य शासनाच्या निधीचा योग्य वापर करून पाणी वापराचे नियोजन करावे.यावेळी शेतकऱ्यांनी पाणी आरक्षणाबाबत आपल्या मागण्या मांडल्या. तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेचा अहवाल सादर केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24