महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा : रेशमा आठरे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर : महात्मा फुले जन आरोग्य योजना ही नागरिकांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा, यासाठी राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत केसरी, पिवळे रेशन कार्डबरोबरच आता पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेमध्ये सुमारे ९७१ आजारांवर निदान केले जात आहे. विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू आहे. नागरिकांनी आजाराच्या निदानासाठी या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा तसेच या योजनेची माहिती नसल्यास राष्ट्रवादी महिला शहर काँग्रेसकडे संपर्क साधावा.

राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी दीड लाख रुपयांचे पॅकेजची तरतूद केली आहे. या रकमेपुढील निदानासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा निधी आयुष्यमान भारत योजनेमध्ये तरतूद केली आहे. तरी नागरिकांनी आपल्या आजाराला घाबरुन न जाता या योजनेची सविस्तर माहिती घेऊन विविध हॉस्पिटशी संपर्क साधून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.

आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी आम्ही नगर शहरामध्ये घरोघरी जनजागृती करणार आहोत. अनेक कुटुंबांना या योजनेपासून माहिती नसल्यामुळे लाभ मिळत नाही. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे आवाहन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24