अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे चिंभळे येथील एका विवाहित महिलेचा तिच्याच राहत्या घरामध्ये पतीला दारूमध्ये गुंगीचे औषध पाजून पती बेशुद्ध होताच आरोपीने महिलेशी अश्लिल चाळे करून विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने माजी सरपंचपती तेजमल झुंबर धारकर याच्याविरुद्ध बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील माजी सरपंच पती तेजमल झुंबर धारकर याने पीडित महिलेच्या पतीस रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास फोन करून सांगितले की माझ्या ग्रामपंचायतचा पॅनल पडून आमचा पराभव झाला असल्याने मी एक आठवडाभर बाहेरगावी होतो
आज गावामध्ये आलो असून तू मला भेटण्यासाठी चौकात ये व माझी गावात १० वर्षांची सत्ता गेल्याने दारू पिऊ म्हणून चौकात बोलाविले. पीडित महिलेचा पती चौकात आल्यानंतर सदर माजी सरपंच पतीचा पॅनल पडल्याने धाब्यावर बसण्यापेक्षा आपण तुझ्याच घरी बसू असे सांगून आरोपी व पीडितेचा पती यांनी घरी एकत्र दारू पिले.
पण हा गावगुंड सरपंच पती याने पीडित महिलेच्या नवऱ्याला दारूमध्ये काहीतरी गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले. काही क्षणात गुंगीचे औषध टाकल्याने पीडितेचा पती झोपी गेला. उशीर झाल्याचा बहाणा करून आरोपी तिथेच झोपला. मात्र आरोपी तेजमल धारकर याने रात्रीच्या दोन वाजण्याच्या सुमारास पीडित महिला गाढ झोपेत असताना
तिच्या शेजारी झोपून अश्लील चाळे सुरु केले. मात्र काही क्षणात महिलेला जाग आल्याने तो आपला पती नसून हा नराधम तेजमल धारकर असल्याचे पाहून तिने नराधामला प्रतिकार करत आरडाओरडा केल्याने आरोपीने महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबातील लोकांना दरवाजाची कडी लावून कोंडून पळ काढला.
नंतर पीडित महिलेने महिलेने तक्रार दिली असून गुन्हा दाखल केल्यानंतर चार दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे.तरी या नराधमास त्वरित अटक करावी अशी मागणी चिंभळा,शिरसगाव बोडखा ग्रामस्थ व महिलांनी केली आहे.
बेलवंडी पोलिस ठाण्याचे बिट पोलीस कर्मचारी यांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला व साहेबांना सारखा सारखा फोन करून त्रास देऊ नका आम्ही कारवाई करतो. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच दिवस उलटूनही आरोपी गावातच मोकाट फिरत आहे. असे पीडित महिलेने सांगितले आहे.
या प्रकरणातील नराधम माजी सरपंच पती तेजमल धारकर याने यापूर्वीही परिसरातील अनेक महिलांचा याचप्रकारे विनयभंग केला आहे. बदनामी होऊ नाही म्हणून कुणी महिला पुढे येत नाहीत. मात्र माझ्यावर अन्याय झालाय व माझ्यावर ज्याप्रकारे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तसा पीडित महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन पीडित महिलेने केले आहे.