अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोना महामारीच्या संकट काळात निस्वार्थ भावनेने मानधन न घेता पोलिस दल व आरोग्य सेवेच्या मदतीसाठी उभे राहिलेले माजी सैनिकांना विमा संरक्षण देऊन त्यांना शासनाच्या सेवेत समावून घेण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी व जनजागृतीसाठी स्वच्छेने महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील माजी सैनिक आरोग्य विभाग व पोलीस दलाच्या मदतीला धावून आले आहेत.
कुठलेही मानधन न मागता जीवाची परवा न करता ते सेवा देत आहेत. सीमेवर व संकट काळात देश रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेले, माजी सैनिक कोरोनाच्या संकट काळात देत असलेल्या सेवेच्या त्यागाची भूमिका लक्षात घेऊन माजी सैनिकांना महाराष्ट्र शासनाने पोलीस दलात किंवा आरोग्य विभागात सन्मानाने सेवेत समावून घ्यावे.
एवढ्या गंभीर परिस्थितीत मोफत सेवा माजी सैनिक देत असताना त्यांच्या कुटुंबाचा विचार करुन त्यांना 50 लाख रुपयांचा संरक्षण विमा देण्याच्या मागणी फाऊंडेशनने महाराष्ट्रातील माजी सैनिक व शहिद परिवाराच्या वतीने केली आहे.
या मागणीसाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, संतोष मगर, दिंगबर शेळके, संभाजी वांढेकर, विनोद परदेशी, संतोष शिंदे, गोपिनाथ डोंगरे, सहदेव घनवट, अशोक चौधर, प्रभाकर जगताप, ताराचंद गागरे,
प्रकाश ठोकळ, शिवाजी गर्जे, रमेश जगताप, भाऊसाहेब रानमाळ, भारत खाकाळ, तैय्यब बेग, कुशल घुले, महादेव शिरसाठ, मनखुक वाबळे, चांगदेव पाचपुते, भानुदास पोखरकर, विजय गायकवाड आदिंसह जिल्ह्यातील माजी सैनिक प्रयत्नशील आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com