पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील ४०१ अतिक्रमणधारकांपैकी ८३ लोकांचे अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयास अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे तर उर्वरित ३१८ लोकांचे २२ जुलैला अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती समजली आहे.
तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील गायरान क्षेत्रामध्ये लोकांनी अतिक्रमण केले म्हणून हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणासंदर्भात अनेक वेळा सुनावण्या देखील झाल्या.
त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने हे प्रकरण अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयात २० जूनपर्यंत सादर करण्याचे आदेश केले. त्यानंतर ४०१ लोकांपैकी ८३ लोकांनी २० जूनपर्यंत नगरच्या दिवाणी न्यायालयात आपली बाजू मांडली.
उर्वरित काही लोकांनी दिवांनी न्यायालयात बाजू मांडली परंतु ती २० जूनची मुदत संपल्यानंतर ज्या लोकांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर केले नाही, अशा लोकांचे अतिक्रमण आहे, असे गृहीत धरून पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या उर्वरित लोकांना १५ जुलैपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस पाठवली.
१९ जुलै रोजी नगरच्या दिवाणी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ८३ लोकांना सद्यस्थितीत दिलासा मिळाला आहे तर उर्वरित लोकांवर मात्र टांगती तलवार आहे. येथील अतिक्रमण हटवण्याच्या या कारवाईबाबत न्यायालयाचा आणखी काही निर्णय शनिवारच्या दिवशी येतो की काय, हेदेखील पाहणे औचित्याचे ठरणार असून गट नंबर २९६ मधील न्यायालयाने स्थगिती दिलेले अतिक्रमण वगळता इतर लोकांची अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मात्र पूर्ण तयारी केलेली असल्याची माहिती समजली आहे.
गट नंबर २९६ मधील ४०१ लोकांपैकी ८३ अतिक्रमणधारकांना अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला असल्याची माहिती या ८३ अतिक्रमणधारकांची बाजू न्यायालयात मांडणारे आहे, असे गृहीत धरून पाथर्डी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या उर्वरित लोकांना १५ जुलैपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस पाठवली.
१९ जुलै रोजी नगरच्या दिवाणी न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान ८३ लोकांना सद्यस्थितीत दिलासा मिळाला आहे तर उर्वरित लोकांवर मात्र टांगती तलवार आहे. येथील अतिक्रमण हटवण्याच्या या कारवाईबाबत न्यायालयाचा आणखी काही निर्णय शनिवारच्या दिवशी येतो की काय, हेदेखील पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
त्यामुळे गट नंबर २९६ मधील न्यायालयाने स्थगिती दिलेले अतिक्रमण वगळता इतर लोकांची अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून मात्र पूर्ण तयारी केलेली असल्याची माहिती समजली आहे.
गट नंबर २९६ मधील ४०१ लोकांपैकी ८३ अतिक्रमणधारकांना अहमदनगरच्या दिवाणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला असल्याची माहिती या ८३ अतिक्रमणधारकांची बाजू न्यायालयात मांडणारे अॅड. सचिन बडे, अॅड. के एम देशपांडे, अॅड. सुभाष काकडे, अॅड. अय्याज शेख, अॅड. निसार शेख यांनी दिली आहे.