अहमदनगर बातम्या

चहापावडरमध्ये आढळली प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके ; राज्यभरात छापे टाकून २८ लाख रुपयांचा साठा जप्त

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : चहा पिणाऱ्यांसाठी एक महत्वाची व धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण तुम्ही जो आवडीने चहा पिता त्या चहात विहित प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके (पेस्टीसाईडस) आढळून आली असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे .

चहा हे भारतातीलच नव्हे तर जगातील अनेकजणांचे आवडते पेय आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकजण सकाळी उठल्यावर एक कप चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. बऱ्याच जणांना वारंवार चहा पिण्याची सवय असते. मात्र प्रमाणापेक्षा अधिक चहा पिणे आरोग्यास हानिकारक असल्याचे देखील समोर आले आहे.

त्याचसोबत तुम्ही पीत असलेला चहा हा विषारी तर नाही ना याबाबत खात्री करा. कारण नुकतेच विहित प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके (पेस्टीसाईडस) आढळल्याने एका नामांकित चहाच्या राज्यभरातील डेपोवर अन्न व औषध प्रशासन गुभवार्ता विभागाने (एफडीए) छापे टाकून सुमारे २८ लाख रुपयांचा साठा जाम केला.

या चहामध्ये विहित प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके (पेस्टीसाईड) असल्याच्या संशयावरून अत्र औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयाने या चहाचे नमुने
विश्लेषणासाठी घेतले होते.

दरम्यान त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील चहाचे विविध फ्लेवरमध्ये पेस्टीसाइडचे प्रमाण विहीत मानदापेक्षा जास्त् आढळून आल्याने मानवी आरोग्यास असुरक्षित घोषित करण्यात आले.

त्या अनुषंगाने गुप्तवार्ता विभागाने राज्यात विविध ठिकाणी धाडसत्राचे आयोजन करून या चहाचा मोठा साठा जप्त केला. या धाडसत्राअंतर्गत पुणे येथील बडकी येथे गुप्तवार्ता विभागाने छापा टाकून या चहाचा सुमारे १४ लाख ६० हजार ८५० रूपये किंमतीचा साठा जप्त केला.

छत्रपती संभाजीनगर येथे वाळुंज एमआयडीसी येथील कंपनीच्या डेपोवर छापा टाकून सुमारे १२ लाख १५ हजार ३६० रूपये किंमतीचा चहाचा साठा जप्त करण्यात आला.

राज्यातील कारवायांमध्ये सातारा येथील मे. महालक्ष्मी ट्रेडींग शाहुपरी या पेढीवर छापा टाकून सुमारे ३६ हजार १२० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला तर कोल्हापुर येथील श्री बालाजी एजन्सी, गडहिंग्लज या पेढीवर केलेल्या कारवाईमध्ये सुमारे १ लाख ४१ हजार २६० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

सदरचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास अन्न व औषध प्रशासन संबंधित कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. चहामध्ये पेस्टीसाईडची मात्रा विहित मानदापेक्षा जास्त येणे ही बाब मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक असल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office