अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहाता शहरात लिंबोनीच्या बागेत मोठ्या संखेने चिमन्या,, बुलबूल, कोकिळा व तितर हे पक्षी अज्ञात आजाराने मृत पावल्याने नागरीक धास्कावले आहेत.
हे मृत पक्षी पशुधन विकास अधिकाऱ्यांनी तपासनीसाठी ताब्यात घेतले आहे. राहाता शहरालगत माजी नगराध्यक्ष सतिष भोंगळे यांच्या लिंबाच्या बागेत दुपारी अनेक पक्षी जमीनीवर पडून तडफडत असल्याचे या बागेत काम करनाऱ्या महिलांना दिसून आले.
याची माहिती त्यांनी बाग मालकांस कळवली. भोंगळे यांनी बागेत जाऊन पाहणी केली असता चिमन्या, लव बर्ड, बुलबूल, कोकीळा, तितर, आदी पक्षी तडफडत मृत पावले होते.
याबाबत त्यांनी राहाता येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांच्याशी संपर्क साधला व पक्षी मृत होत असल्याची माहीती दिली. डॉ. बन यांनी तातडीने बागेत जावून पाहानी केली व मृत पक्षी ताब्यात घेतले.
चार दिवसापुर्वी गांधी यांच्या वस्तीवर कावळेही मृत आढळले होते. या प्रकारामुळे नागरीकांत भितीचे वातावरण पसरत आहे. राहाता शहरात पोल्ट्री फॉर्म अधिक प्रमाणावर नसले तरी गावरान कोंबड्यांचे शेड मोठ्या प्रमाणावर आहे.
सध्या जिल्ह्यात काही छिकाणी बड फ्ल्यु बाधीत अहवाल आल्याने अगोदरच चिंतेत असलेले नागरीक या प्रकारामुळे धास्तावले आहे.